Posts

तरूणांनो व्यसनाच्या आहारी जाताय? कुठलेही संकट आल्यावर नंतर त्यातून सावरण्यापेक्षा ते येऊ नये, अशी खबरदारी घेणे हे नेहेमीच शहाणपणाचे असते. मौजमजेच्या नावाखाली केलेले व्यसन हे तुमचे व तुमच्या भावी पिढीचेही नुकसान करीत आहे हे लक्षात घ्यायला हवे. वैद्यकिय सुविधांचे प्रमाण जेवढे वाढतेय, त्याच्या अनेक पटींनी कॅन्सर चा धोकाही वाढत आहे. कॅन्सर किंवा कर्करोग अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार, वेळीच निदान नाही झाले तर हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. यातल्या कर्करोगाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहे. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे. यातले पहिले कारण म्हणजे तंबाखू, गुटखा आणि सिगारेट. वारंवार आपण कर्करोगाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या जाहिराती पाहतो. यात या प्रमुख दोन कारणामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो असे सांगतात पण या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहे. सतत जंक फुड, चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील कर्करोगाला कारणीभूत आहेत. वैद्यकीय चिकित्सा करण्याच्या तंत्रज्ञानात अ
Recent posts